Veerdhaval Jagdale NCP : Daund Vidhan Sabha : दौंडची जागा राष्ट्रवादीला मिळावी;जगदाळे यांची मागणी

Continues below advertisement

Veerdhaval Jagdale NCP : Daund Vidhan Sabha : दौंडची जागा राष्ट्रवादीला मिळावी;जगदाळे यांची मागणी

ही बातमी पण वाचा

राज्यात मुसळधार पावसाची दाणादाण; पुराच्या पाण्यात बैलगाडीसह दाम्पत्य गेले वाहून, बैल पोळ्याच्या पूर्वसंध्येला बैलाचा मृत्यू 

Maharashtra Rain वाशिम : हवामान विभागाने वर्तविलेल्या (IMD) अंदाजानुसार नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना दमदार पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे  (Heavy Rain) अनेक भागात जलमयस्थिती निर्माण झालीय. तर, पावसामुळे अनेक प्रकल्प, नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहे.  अशातच वाशिम (Washim News) जिल्ह्यालाही आज पावसाने चांगलेच झोडपून काढलं आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज वाशिम जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आलाय. मात्र, शनिवारच्या रात्रीपासून जिल्ह्यातील अनेक भागात रात्रभर पाऊस बरसलाय. 

तर आज सकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यात जिल्ह्यातील कारंजा, मानोरा आणि मंगरूळपीर तालुक्यात काही प्रमाणात नदी नाल्यांना पूर आल्याचे चित्र पहावायस मिळालंय. तर मनोराच्या इंझोरी इथ बैल पोळ्यानिमित्त  बैलांना चारा आणण्यासाठी गेलेले दाम्पत्य पुराच्या पाण्यात बैलगाडीसह वाहून गेल्याचा प्रकार घडला आहे. सुदैवाने यात शेतकरी बचावले असले तरी दोन बैल पैकी एका बैलाचा मात्र पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झालाय. बैल पोळ्याच्या पूर्वसंध्येला शेतकर्‍याच्या बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तर अनेकांच्या शेतातील उभ्या पिकात पाणी  शिरल्याने शेतीचेही मोठं  नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

गोदावरी वाहू लागली दुथडी, गोदाकाठची सर्व मंदिर पाण्याखाली 

परभणी जिल्ह्यात आज सकाळपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणची प्रकल्प भरायला लागली आहेत. परिणामी, यात आता परभणीच्या गंगाखेडकरांची चिंता मिटली आहे. कारण तीन वर्षानंतर गंगाखेड मधील मासोळी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यावरून पाणी सुद्धा वाहत आहे. तर दुसरीकडे गोदावरी नदीवरील मुद्गल बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडल्याने गोदावरी नदी ही दुथडी भरून वाहत आहे. याचमुळे गंगाखेडच्या गोदाकाठावरील सर्व मंदिरही पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, पाऊस असाच सुरू राहिला तर गोदावरीला पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram