VBA vs RSS: सुजात आंबेडकरांचे संघाला थेट आव्हान, मोर्चावरुन वाद पेटला
Continues below advertisement
वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यालयावर मोर्चा काढल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही काढलेल्या या मोर्चातून सुजात आंबेडकर यांनी, 'हमको बहुत लोग आके नाम रखते हैं, बी टीम बोलते हैं... वंचित बहुजन आघाडीने आरएसएस के कार्यालय पर मोर्चा निकाला है, तेरे में है हिम्मत?' असा थेट सवाल करत विरोधकांना आव्हान दिले. आरएसएसवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. दुसरीकडे, संघाचे स्वयंसेवक सागर शिंदे यांनी हा मोर्चा म्हणजे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलेली 'राजकीय स्टंटबाजी' असल्याची टीका केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असताना मोर्चा संघाच्या कार्यालयाऐवजी पोलीस आयुक्त कार्यालयावर काढायला हवा होता, असेही शिंदे म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement