Vasant More Meet Uddhav Thackeray : वसंत मोरे उद्धव ठाकरेंची भेट घेणार

तोश्रीवर आज दुपारी साडेबारा वाजता वसंत मोरे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती आहे   वसंत मोरे यांच्यासोबत संजय राऊत आणि  शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते  हे सुद्धा मातोश्रीवर  उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी येणार आहेत  *लवकरच शिवसेना ठाकरे गटात वसंत मोरे  प्रवेश करण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे *   त्याआधी आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत वसंत मोरे मातोश्रीवर चर्चा करतील   लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा  आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी  वसंत मोरे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली होती   मात्र काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये उमेदवार दिल्याने  वसंत मोरे यांना उमेदवारी मिळू शकली नाही    त्यामुळे वंचित बहुजन आघाडी कडून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती    आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता  वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील अशी माहिती आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola