Vasai School Fire : विद्या निकेतन शाळेत अग्नितांडव,शाळेतील सामानाची रुम जळून खाक : ABP Majha
वसईतील विद्या निकेतन शाळेत शॉर्ट सर्किटने आग लागून शाळेतील सामानाची रूम पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात शाळकरी मुलांना वेळेत बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना घडली नाही. रूममधून आगीच्या धुराचे लोळ बाहेर निघताच शाळा प्रशासनाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवलं... वसई पूर्व फादरवाडी या परिसरात ही विद्या निकेतन शाळा आहे. आज दुपारी 12 च्या सुमारास ही आग लागली होती.