Vasai Marriage: पतीच्या दुसऱ्या लग्नात राडा करुन पहिल्या पत्नीनं केला भांडाफोड ABP Majha

Continues below advertisement

वसई पूर्वेच्या वसंतनगरी परिसरातील जोशी पार्टी हॉल मध्ये हा प्रकार घडला होता. अर्जुन सिंग असं पतीचं नाव असून, कांचन सिंग असं पत्नीचं नाव आहे. २०१२ मध्ये दोघांचा वैदीक पद्धतीने विवाह झाला होता.  पतीने हवा तो हुंडा ही घेतला,  मात्र सहा महिन्यातच पतीने पत्नीला दूर केले.   या दोघांच्या घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू असतानाच,  रविवारी पती दुसरं लग्न करत असल्याचं, कांचनला समजलं आणि तिने मग भर लग्न मंडपात येऊन राडा घातला. पत्नीने दाखवलेल्या या धाडसामुळे नवरदेवाच्या पहिल्या लग्नाचा भांडाफोड झाला व दुसरं लग्न होता होता थांबलं. सुमारे  दोन तास सुरू असलेल्या या राड्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मध्यस्ती करत वातावरण शांत केलं. पतीने केलेल्या या कृत्याबाबत त्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पिडित पत्नीने केली आहे.
 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram