Vasai Crime News : आरोपीनं आरतीला धमकी दिल्याची पोलिसांकडे तक्रार केली होती, कुटुंबियांची माहिती

Vasai Crime News : आरोपीनं आरतीला धमकी  दिल्याची पोलिसांकडे तक्रार  केली होती, कुटुंबियांची माहिती
पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये प्रियकराने प्रेयसीची भर रस्त्यात निर्घृण हत्या केली. आरती यादव असं मृत प्रेयसीचं नाव आहे, तर रोहित यादव असं आरोपीचं नाव आहे, त्याला पोलिसांनी अटक केलीये.. दरम्यान या प्रकरणी मृत तरुणी आरती यादवच्या कुटुंबियांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेत .. दरम्यान त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांनी..
 शनिवारी ८ जून ला रोहितने भर रस्त्यात आरतीला मारहाण केली होती. तिचा मोबाईल फोडला होता. आणि तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याबबत आरतीने आचोळे पोलीस ठाण्यात तक्रार ही दाखल केली होती. माञ पोलिसांनी तक्रार  दाखल करुन घेतली. आणि रोहीतकडून पैसे घेवून त्याला सोडून दिल्याचा आरोप आरतीची बहिण सानिया हिने केला आहे. त्यामुळे रोहित जेवढा दोषी आहे तेवढाच हत्याकांडाच्यावेळी बघ्याची भूमिका घेणारे ते लोक, पैसै घेवून रोहितला सोडणारे पोलीस ही दोषी असल्याचा आरोप सानिया हिने केला आहे.




















 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola