Vare Nivadnukiche Superfast News 07 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 14 May 2024

Continues below advertisement

मुंबईत अनेक ठिकाणी मतदानाचं ढिसाळ नियोजन.. गोरेगाव, दहिसर, मुलुंड भागात मतदारांची ओढाताण, आयोगाच्या नियोजनावर मतदार संतप्त
निवडणूक आयोगाकडून जाणीवपूर्वक मतदानासाठी विलंब, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप...पराभवाच्या भीतीने मोदी सरकार पछाडल्याची ठाकरेंची टीका...तर उद्धव ठाकरे यांचं रडगाणं सुरू, फडणीवासांचा हल्लाबोल... 
पहाटेचे चार वाजले तरी मतदान झाल्याशिवाय मतदारांनी मतदान केंद्र सो़डू नये, उद्धव ठाकरेंचं आवाहन...तर संथगतीनं मतदानाची तक्रार आम्हीच आधी केली होती, फडणवीसांचा टोला...
महाराष्ट्रात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ४८.६६  टक्के मतदान, दिंडोरीत सर्वाधिक ४५.९५ टक्के,
तर सर्वात कमी कल्याणमध्ये ४१.७०  टक्के मतदान
पवईच्या हिरानंदानी भागात दोन तासांच्या गोंधळानंतर मतदान पुन्हा सुरु, ठाकरे गटाच्या आदेश बांदेकरांचा संताप, शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडेंना थेट आत सोडल्याने तीव्र नाराजी
ईव्हीएम कक्षाला हार घातल्याने शांतिगिरींंवर आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल...त्र्यंबकेश्वरमध्ये केंद्रप्रमुखांना न जुमानता मतदान कक्षावर गळ्यातला हार घातल्याचा आरोप
सलमान खान, शाहरुख खान, सचिन तेंडुलकर, अमिर खान, बिग बी अमिताभ बच्च, रेखा, रणवीर, दीपिका, हृतिक रोशन, शिल्पा शेट्टीचं मतदान...तर दोन तास रांगेत उभं रहावं लागल्याने अभिनेत्री भाग्यश्रीचा संताप...
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी कठोर कारवाई करा, गृहमंत्री फडणवीसांचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश..तर भरधाव वेगात कार चालवतानाचा नवा सीसीटीव्ही समोर
बारावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, बोर्डाचा निकाल उद्या जाहीर होणार, दुपारी एक वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार 
राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी.. जालन्यात अनके ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस तर तळकोकणातही मान्सूनपूर्व पावसाच्या सरी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram