Vande Bharat Express : कोकण रेल्वे मार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला मिळाला मुहूर्त
Continues below advertisement
कोकण रेल्वे मार्गावरील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला अखेर मुहूर्त मिळाला आहे. मडगाव-मुंबई सीएसएमटी वंदे भारतला येत्या शनिवारी, ३ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर, ५ जूनपासून ही गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होईल, अशी खात्रीशीर माहिती कोकण रेल्वे प्रशासनाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. या गाडीला रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी व खेड येथे थांबे देण्यात आले आहेत.
Continues below advertisement