Diwali Padwa 2025 : 50 वर्षांच्या लग्नाची लव्हस्टोरी; Vandana Gupte Shirish Gupte यांच्याशी गप्पा
Continues below advertisement
दिवाळी पाडव्याच्या विशेष कार्यक्रमात अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) आणि त्यांचे पती अॅडव्होकेट शिरीष गुप्ते (Shirish Gupte) यांनी त्यांच्या 52 वर्षांच्या यशस्वी सहजीवनाचे रहस्य उलगडले. ‘एखादी गोष्ट तुम्हाला टाळता येत नसेल तर ती एन्जॉय करा’, असे शिरीष गुप्ते म्हणाले. पहिल्या नजरेतच प्रेमात पडल्याचा किस्सा सांगताना, वंदना यांना पाहताच ‘या मुलीशी मला लग्न करायचंय’ असं ठरवलं होतं, असं शिरीष यांनी सांगितलं. लग्नानंतर सासऱ्यांनी दिलेला गमतीशीर सल्ला, ‘तुमच्या घरी तर फक्त रिटेलचा तुकडा पाठवलाय, आमच्या घरी होलसेल गोडाऊन आहे,’ हा किस्साही त्यांनी सांगितला. आजच्या काळात घटस्फोटाचे वाढते प्रमाण बघता, तरुण जोडप्यांनी तडजोड (Adjustment) आणि सामंजस्याने नाती जपावीत, घरात अहंकार (Ego) आणू नये, असा सल्ला दोघांनी दिला. एकमेकांच्या करिअरसाठी केलेला त्याग आणि एकमेकांना दिलेला पाठिंबा हेच त्यांच्या यशस्वी नात्याचे गमक असल्याचे त्यांनी सांगितले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement