Anil Kaspate Special Report : आधी वैष्णवीचा छळ, चारित्र्यावर शिंतोडे, मनावर ओरखडे Vaishnavi Hagawane

Anil Kaspate Special Report : आधी वैष्णवीचा छळ, चारित्र्यावर शिंतोडे, मनावर ओरखडे Vaishnavi Hagawane 
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरु झाली. पण सुनावणीच्या पहिल्याच दिवशी संशयित आरोपी असलेल्या हगवणेंच्या वकिलांनी थेट वैष्णवीचं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. आपल्या अशिलांचा बचाव करताना हगवणेंच्या वकिलांनी त्यांच्यावरचे आरोपही साफ फेटाळले. 
मात्र आज कस्पटे कुटुंबीयांनी माध्यमांसमोर येत हगवणेंकडून या प्रकरणाला वेगळं वळण दिलं जात असल्याचा आरोप केलाय... पाहूयात या सगळ्याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट..... 
अनिल कस्पटेंची मुलगी वैष्णवी आज या जगात नाही...  सासरे, सासू आणि नणंदेकडून झालेला अमानुष छळ...  पतीकडून झालेली मारहाण...  चारित्र्यावर उडवले गेलेले शिंतोडे...  या सगळ्याचा जाचातून सुटका करुन घेण्यासाठी  वैष्णवीनं आत्महत्येचा टोकाचा मार्ग निवडला...  पण तिच्या आत्महत्येनंतरही हगवणे कुटुंबानं परिसीमा गाठली...  न्यायालयात हगवणेंच्या वकिलांनी आपल्या अशिलांना वाचवण्यासाठी  वैष्णवीचंच चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला.... 
आरोपींनी आपल्या गुन्ह्यावर पांघरुण घालण्यासाठी  थेट वैष्णवीच्याच चारित्र्यावर संशय घेतला...  या आरोपांनंतर वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे समोर आले  आणि माध्यमांसमोर आले आणि त्यांनी   हगवणेंकडून या प्रकरणाला वेगळं वळण दिलं जात असल्याचा आरोप केला

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola