लोकप्रिय गायिका Vaishali Bhaisne Made यांची धक्कादायक पोस्ट, माझ्या हत्येचा कट रचला जातोय -वैशाली

लोकप्रिय गायिका वैशाली भैसने माडे हिनं नुकतंच फेसबुकवर पोस्ट शेअर करत जीवाला धोका असल्याचे म्हटलंय. आपल्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप वैशालीने या पोस्टमधून केलाय. काही लोकांकडून जीवाला धोका असल्याचं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय. या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करणार असल्याचे वैशालीने म्हटलंय. त्यामुळे वैशालीच्या जीवावर कोण उठलंय? तिला कोण धमकावतंय असे सवाल उपस्थित होतायत. वैशालीने पोस्ट केल्यानंतर चाहत्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येतेय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola