US Tariffs | भारतावर 25% अतिरिक्त कर, एकूण 50% आयात शुल्क; 27 ऑगस्टपासून लागू
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25% कर लादण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. यामुळे अमेरिकेचा भारतावरील एकूण आयात कर 25% वरून आता 50% झाला आहे. ही करवाढ 21 दिवसांनंतर म्हणजेच 27 ऑगस्टपासून लागू होईल. रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतावर ही कारवाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद केले आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी धमकी दिली होती की, भारत रशियाशी तेल खरेदी करून युक्रेन विरोधातल्या युद्धाला खतपाणी घालत आहे, त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाईची गरज आहे. या आदेशामुळे भारत आणि अमेरिकेच्या व्यापार संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. या निर्णयामुळे भारतीय निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.