US Election 2020 | अमेरिकेत मराठी 'ठाणेदारा'चा डंका; मिशिगनमधून उद्योजक श्री ठाणेदार आमदार
अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये रोमांच शिगेला पोहोचला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डेमोक्रिटिकचे उमेदवार जो बायडन विजयाच्या जवळ पोहोचले आहेत. या निवडणुकीच्या धामधुमीत एका मराठमोळ्या नावाचा डंका अमेरिकेत वाजला आहे. श्री ठाणेदार यांनी मिशिगन राज्यातून शानदार विजय मिळवत आमदारकी मिळवली आहे. श्री ठाणेदार मिशिगन यांनी राज्यातून यावर्षी 'हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्ह' म्हणजेच विधानसभेची निवडणूक लढवली. त्यांचं एक यशस्वी उद्योजक - 'ही श्रीची इच्छा' प्रसिध्द आत्मचरित्र आहे. आजपर्यंत डेमोक्रॅटिक पक्षाचे मोठे देणगीदार असलेले श्री ठाणेदार आता पक्षाचे लोकनियुक्त प्रतिनिधी झाले आहेत.
Tags :
Indian Origin Millionaire Shri Thanedar Us Presidential Elections US Election US Election 2020 Mla India Donald Trump Joe Biden