Urmila Kanetkar Car Accident : अपघातात जखमी झालेल्या उर्मिला कोठारेवर उपचार सुरु, कुटुंबाची माहिती
Urmila Kanetkar Car Accident : अपघातात जखमी झालेल्या उर्मिला कोठारेवर उपचार सुरु, कुटुंबाची माहिती
अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या (Urmila Kothare) कारच्या भीषण अपघात झाल्याची धक्कादायक बातमी सध्या समोर आलेली आहे. या अपघातात उर्मिलाच्या कारने मेट्रोमध्ये काम करणाऱ्यांना दोन मजुरांना उडवलं. यामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला असून एक मजूर गंभीर जखमी आहे. तसेच उर्मिला आणि तिच्या चालकालाही दुखापत झाल्याची माहिती आहे.
याप्रकरणी पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला असल्याची माहिती समोर आलेली आहे. पण हा अपघात नेमका कसा झाला असा प्रश्न सध्या अनेकांना पडलाय. यासंदर्भातही पोलिसांनी माहिती दिली आहे. उर्मिला शुटींगवरुन परतत असताना तिच्या कारने या दोन मजुरांना उडवलं.
नेमकं काय घडलंय?
उर्मिला शुटींगवरुन घरी परतत होती. त्याचवेळी मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही धक्कादायक घटना घडली. उर्मिलाची कार ही वेगात होती. मेट्रोमध्ये काम करणाऱ्या या दोन मजुरांना उर्मिलाच्या भरधाव कारने उडवलं. याच घटनेत एका मजुराचा मृत्यू झालाय. तसेच दुसरा मजूर गंभीर जखमी असल्याचीही माहिती आहे. कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगाने जात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोन मेट्रो कर्मचाऱ्यांना धडक दिली.