Uran Case | यशश्री शिंदेची स्टेशनजवळच्या निर्जनस्थळी हत्या, तपास कुठपर्यंत आला? Yashashri Shinde
Uran Case | यशश्री शिंदेची स्टेशनजवळच्या निर्जनस्थळी हत्या, तपास कुठपर्यंत आला? Yashashri Shinde
उरण हत्याकांड प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या ऋता आव्हाड आंदोलनात सहभागी यशश्री शिंदे आणि अक्षता म्हात्रे प्रकरणात दोषींना फाशी द्या अशी मागणी अत्याचार झालेल्या मुलींच्या पालकांना पोलीस खाते कोणत्याही प्रकारे सहकार्य करत नाहीत अशी तक्रार पालकांनी केल्यानंतर मला गृह खात्याची कीव आली. ज्यांनी कायदा सुव्यवस्थेचे पालन करायला हवेत त्यांच्यावरच जर जनतेचा विश्वास नसेल तर काय उपयोग आहे मागच्या आठवड्यात अक्षता म्हात्रेच्या घरी ऋता आव्हाड यांनी दिली भेट मणिपूर असो किंवा जगातील कोणताही देश असो समाज आणि कायद्याची भीती राहत नाही तेव्हा अशा पद्धतीच्या वृत्ती बोकाळतात. पोलिसांना जाग करण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलं निवडणुका आल्या म्हणून तुम्ही लाडकी बहीण आणली त्या योजनेप्रमाणे आता तुम्ही या दोन्ही घटनांचा निकाल लावावा. म्हणजे तुमच्या शिरपेचात आणखीन एक तुरा खोवता येईल असा खोचक टोला ऋता आव्हाड यांनी लगावला या दोन्ही घटनांना कुठलाही राजकीय आणि धार्मिक रंग देऊ नका कारण ही दोन्ही माणसेच होती. त्यापेक्षा त्यांना लवकरात लवकर जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल ते पहा.