UPSC Results | केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्राची बाजी!
संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी)ने सिव्हिल सेवा परीक्षा 2019चा निकाल जाहीर केला आहे. अंतिम निकाल आयोगाची ऑफिशिअल वेबसाइट upsc.gov.in वर जारी करण्यात आला आहे. विद्यार्थी या वेबसाइटवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात. सप्टेंबर, 2019मध्ये घेण्यात आलेल्या लेखी परीक्षा आणि फेब्रुवारी-ऑगस्ट, 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इंटरव्ह्यूच्या आधारावर आयोगाने मेरिट लिस्ट जारी केली आहे. सिव्हिल सेवा परीक्षेत प्रदीप सिंह संपूर्ण देशातून पहिला आला आहे.