Yogi Adityanath : UP मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची राज्यपाल Bhagatsingh Koshyari यांची भेट

Continues below advertisement

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर दाखल झाले आहेत. उत्तर प्रदेशातली औद्योगिक गुंतवणूक वाढवण्याचा मुख्य उद्देश त्यांच्या मुंबई भेटीमागे आहे. योगी आदित्यनाथ हे आपल्या मुंबई दौऱ्यात प्रख्यात उद्योगपती आणि काही बॉलीवूड सेलिब्रिटींच्याही भेटी घेणार आहेत. त्यापैकी काही भेटींमध्ये दीर्घ बैठका होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातल्या गुंतवणुकीच्या संधी आणि राज्य सरकारकडून त्यासाठी मिळणाऱ्या विशेष सवलती याबाबत माहिती देऊन बड्या उद्योजकांना आकर्षित करण्याचा योगी आदित्यनाथ यांचा प्रयत्न आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram