Maharashtra Unlock : मुंबईसह राज्यभरात मार्चनंतरच 100 टक्के अनलॉकचा निर्णय होणार : ABP Majha

Continues below advertisement

मुंबईसह राज्यभरात मार्चनंतरच १०० टक्के अनलॉकचा निर्णय होईल, असं स्पष्ट झालंय. कोरोना नियंत्रण असंच कमी होत गेलं तर मार्चनंतर १०० टक्के अनलॉकचा निर्णय घेता येईल, अशी माहिती राज्याच्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी दिलीय. ब्रिटनमध्ये डेल्टाक्रोनसारखा नवा व्हेरियंट आढळल्यानं टास्क फोर्सनं ही सावध भूमिका घेतलीय. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ओमायक्रोन सर्वाधिक वेगानं पसरला, पण या व्हेरियंटच्या कमी घातकतेमुळे महिनाभरातच ही लाट नियंत्रणात आली. त्यामुळे १ फेब्रुवारीपासून सर्व राष्ट्रीय उद्याने, पर्यटन स्थळे, चौपाटय़ा, उद्याने-मैदाने पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यात आली. पण मनोरंजन पार्क, थीम पार्क, स्वीमिंग पूल, रेस्टॉरंट, हॉटेल, चित्रपटगृहं, नाटय़गृहं ५० टक्के क्षमतेनं सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram