राज्यात मद्यालयं सुरु, ग्रंथालयं मात्र बंदच; वाचनालय, अभ्यासिका सुरु करा, वाचनप्रेमींची मागणी
Continues below advertisement
बिअर बार, रेस्टॉरंट सुरू झाल्यानंतर आता वाचनालयं का सुरू होत नाहीत याबाबत सवाल केला जात आहे. वाचनप्रेमींमधून देखील वाचनालयं किंवा ग्रांथालयं सुरू करा ही मागणी वाढत आहे. सारे नियम आणि अटी -शर्थींसह बार, हॉटेल, रेस्टॉरंट सुरू झाली मग आम्ही देखील सारे नियम पाळून ग्रंथालयं सुरू करू असा सूर सध्या पाहायाला मिळत आहे. केवळ आर्थिकच नव्हे तर पुस्तक रूपी मौल्यवान ठेवा देखील यामुळे संकटात सापडला आहे. त्यामुळे माजी राष्ट्रपती आणि महान वैज्ञानिक डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी वाचना प्रेरणा दिवसाचं निमित्त साधत का असेना वाचनालयं, ग्रंथालयं सुरू करा अशी मागणी आती पुढे येत आहे.
Continues below advertisement