Mulidhar Mohol NCP Offer : राष्ट्रवादीत येण्याची होती ऑफर, मोहोळांनी सांगितला 'तो' खास किस्सा

Continues below advertisement
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) आलेल्या ऑफरबद्दल एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'तुझं तिकीट कट झालंय. चंद्रकांत दादा आलेत. आता तू माझ्याबरोबर चल', अशी थेट ऑफर राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) आल्याचे मोहोळ यांनी सांगितले. तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळचा हा किस्सा उघड केला. मोहोळ यांनी सांगितले की, भाजपमधून (BJP) उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादीत गेलेले आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी त्यांना फोन करून ही ऑफर दिली होती. त्यावेळी कोथरूडमधून (Kothrud) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना उमेदवारी मिळाल्याने मोहोळ यांचे तिकीट कापले गेले होते. मात्र, 'मी दिल्या घरी सुखी आहे' असे सांगत आपण ही ऑफर नाकारल्याचे मोहोळ म्हणाले. पुढे ते म्हणाले की, शेळके त्यांच्या पक्षात यशस्वी झाले आणि मी माझ्या पक्षात राहून यशस्वी झालो.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola