Pune Politics: धंगेकरांचे आरोप, मोहोळ थेट मुख्यमंत्र्यांच्या दारी Special Report
Continues below advertisement
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. पुण्यातील जैन बोर्डिंगच्या (Jain Boarding) जमिनीच्या व्यवहारावरून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. 'ज्या कंपन्यांनी हा व्यवहार केला त्या कंपन्यांमधली आपली भागीदारी आपण अगोदरच काढून घेतलेली होती,' असे स्पष्टीकरण मोहोळ यांनी दिले होते. मात्र, धंगेकरांनी आरोप सुरूच ठेवले असून, २०২৪ च्या निवडणूक शपथपत्रात मोहोळांनी संबंधित कंपनीचा उल्लेख केल्याचा दावा केला आहे. या भेटीत मोहोळ यांनी धंगेकरांच्या आरोपांसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापौरपदाच्या कार्यकाळातील गाडी वापराच्या प्रकरणावरूनही धंगेकर यांनी मोहोळांवर आरोप केले आहेत. त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement