UNION BUDGET 2022 : निर्मला सीतारमण मध्यमवर्गीयांना अपेक्षित करसवलत देणार का?

Continues below advertisement

कोरोनाचं संकट, महागाईचा वाढता आलेख, इंधनाच्या वाढत्या किंमती आणि घसरता रुपया या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर सादर होणाऱ्या या बजेटमध्ये अर्थमंत्री सीतारामन लोकप्रिय घोषणा करणार का याची उत्सुकता आहे. शेतकरी आणि मध्यमवर्गीयांसाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणांची अपेक्षा आहे. नोकरदार आणि करदात्यांसाठी आयकरात दिलासा दिला जाणार का याकडेही लक्ष लागलं आहे. रोजगारवाढीसाठी अर्थसंकल्पात ठोस उपाययोजना केल्या जातील अशी अपेक्षा आहे. अर्थसंकल्पातच सादर होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पात तिकीटाचे दर, नवे प्रकल्प आणि नव्या गाड्या याबाबत अर्थमंत्र्यांच्या घोषणांकडे लक्ष असेल. मुंबईच्या लोकल रेल्वेसाठी केंद्र सरकार कोणत्या घोषणा करणार याकडे मुंबईकरांच्या नजरा आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram