Uncertain Rain and Hailstorm | विदर्भात गारपीट, शेतीचंं मोठं नुकसान | ABP Majha
नववर्षाच्या सुरवातीलाच अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडणार आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीलाच राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. या पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्यात वाशिम, नांदेड, यवतमाळ, हिंगोलीत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर विदर्भातील वर्धा, नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील काही भागात गारपीट झाली आहे.
Tags :
Farmer Loss Rainfall In Maharashtra Uncertain Rain Update Uncertain Rainfall Hailstorm Maharashtra