Rahul Gandhis Disqualification : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना गुरुवारी (23 मार्च) दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती, त्यानंतर आज राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या 10 जुलै 2013 च्या निकालानुसार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.