Ujani Dam Water : लाकडी निंबोडी योजनेला सोलापुरातील सर्वपक्षीय आणि शेतकऱ्यांचा विरोध
उजनीचं पाणी इंदापूर, बारामतीला देण्याच्या योजनेविरोधात सोलापुरात वातावरण तापलंय. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात आरती करण्यात आली. उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी ही आरती केली. लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेला सोलापुरातील शेतकरी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध दर्शवलाय. उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने कालपासून आंदोलनही सुरु केलं. याच पार्श्वभूमीवर आज सिद्धेश्वर मंदिरात आरती करुन सरकारचा निषेध करण्यात आला.