Ujani Dam Boat Update : उजनी धरणात बुडालेली बोट अखेर सापडली ABP Majha

Ujani Dam Boat Update : उजनी धरणात बुडालेली बोट अखेर सापडली ABP Majha
इंदापूर तालुक्यात एक भयानक घटना घडलीय. करमाळा तालुक्यातील कुगाव मधून इंदापूर तालुक्यातील काळशीकडे एक बोट प्रवाशांना घेऊन येत होती. यावेळी जोराचा वारा सुटल्याने ही बोट भीमा नदी पात्रात बुडाली गेली.या बोटीत सात प्रवासी होते त्यापैकी एक प्रवासी हा पोहून पाण्यातून बाहेर आल्याने त्याचा जीव वाचलाय. तर इतर सहा व्यक्तींचा कालपासून शोध सुरू आहे.अद्याप पर्यंत या सहा लोकांचा शोध लागलेला नाहीये. रात्री नऊ वाजताच्या सुमारास शोध कार्यात अडथळा येत असल्याने ही शोध मोहीम थांबवण्यात आली होती आता सकाळी सात वाजल्यापासून ही शोध मोहीम पुन्हा सुरू झाली. थोड्याच वेळात काळाशी गावच्या या भीमा नदीच्या पायथ्याशी एनडीआरएफ पथक देखील दाखल होईल आणि त्यानंतर ही शोध मोहीम सुरू करण्यात येईल जी माणसे बेपत्ता आहे तर त्यामध्ये तीन पुरुष एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती प्राप्त होतेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola