
Uddhav Thackeray PC : उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद, कुठे आहे नक्की पत्रकार परिषद?
Continues below advertisement
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे आज दुपारी ४ वाजता महापत्रकार परिषद घेणार आहेत. मुंबईतल्या NSCI कॉम्प्लेक्समध्ये ही महापत्रकार परिषद पार पडणार आहे. यामध्ये उद्धव ठाकरे मोठे गौप्यस्फोट करणार आहेत. तसंच, शिवसेनेत २०१८ साली झालेल्या अंतर्गत निवडणुकीतले काही व्हिडीओ दाखवले जाण्याची देखील शक्यता आहे. या पत्रकार परिषदेत काही कायदेतज्ञांनाही बोलावण्यात आलंय. ते देखील आपलं मत मांडतील असं बोललं जातंय. त्यामुळे आजच्या महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Continues below advertisement
Tags :
NSCI Maharashtra : Uddhav Thackeray 'Maharashtra Maha Press Conference Maha Patrakar Parishad