Mahim Candidacy Shivsena : दादर माहीमच्या उमेदवारीबाबत ठाकरे गट आज निर्णय घेणार

Continues below advertisement

Mahim Candidacy Shivsena : दादर माहीमच्या उमेदवारीबाबत ठाकरे गट आज निर्णय घेणार  

 महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)ने विधानसभेची (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) आणखी एक यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार, माहीम विधानसभा मतदारसंघातून आता राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) हे विधानसभेच्या मैदानात उतरणार आहे. अमित ठाकरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज शिवतीर्थ या निवासस्थानी मनसैनिकांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर अमित ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.   मनसेच्या उमेदवारांच्या यादीत नाव आल्यानंतर माझ्या पोटात गोळा आला. मी लहान पणापासून या भागात वाढलोय, आम्हाला या मतदार संघातले विषय मला माहित आहे. लोकांचे प्रश्न मला तोंडपाठ आहे. त्यामुळे समोर कुणीही आलं तरी मी लढणार, अशी भूमिका अमित ठाकरेंनी जाहीर केली. निवडून आल्यानंतर पहिला कोणाता मार्गी लावणार असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी माहीम-दादरमधील समुद्रकिनाऱ्याचा प्रश्न मी मार्गी लावणार...निसर्गाने दिलेला समुद्रकिनारा मला स्वच्छ करायचा आहे, असं अमित ठाकरेंनी सांगितले.   आदित्य ठाकरेंनी सत्तेत असताना निवडणूक लढवली- राज ठाकरेंकडे मी कधीही मतदारसंघाचा आग्रह केला नाही. मी स्वत: त्यांना सांगितलं, माझ्यासाठी 10 सीट कॉम्प्रमाईज झाल्या नाही पाहिजे. कोणासोबतही बोलू नका, असं अमित ठाकरे म्हणाले. राज ठाकरे मला नेहमी सांगतात हे राजकारण आहे. समोरचे कसे आहेत हे ओळखता आले पाहिजे. तुमचं राजकारण तुम्ही करा, आमचं राजकारण आम्ही करु. मी एकटं उभं राहून लढून काय फायदा?, राज ठाकरेंनी सांगितलंय, स्वबळावर म्हणजे स्वबळावर...पक्षाला गरज होती म्हणून मी निवडणूकीत उतरण्याचा निर्णय घेतला. मी माहीमकरांच्या प्रश्नासाठी एक दिवस देणार, असंही अमित ठाकरेंनी सांगितले. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram