Uddhav Thackeray : मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार आताच जाहीर करा, उद्धव ठाकरे यांची विनंती

Continues below advertisement

मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरुन महाविकास आघाडीतला विसंवाद पुन्हा एकदा समोर आलाय.. कारण मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा केलीय... काँग्रेस किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं चेहरा जाहीर करावा, मी पाठिंबा देतो असं ठाकरे म्हणालेत.. ठाकरेंची मागणी संजय राऊतांनीही लावून धरलीय..  फक्त शरीर सोबत घेऊन चालणार नाही, मुंडकंही सोबत घेऊन निवडणुकीत उतरावं असं राऊत म्हणालेत

निवडणूक आयोग एक नंबरचा गुलाम, काय अपेक्षा करणार? हरियाणाचा निकाल येताच ठाकरेंच्या खासदाराचा हल्लाबोल

मुंबई : हरियाणा विधानसभा निवडणुकीचे (Hariyana Assembly Election Results 2024) निकाल आता समोर येत आहेत. काँग्रेसने (Congress) मतमोजणीच्या सुरुवातीलाच मोठी आघाडी घेतली. मात्र तासातच चित्र उलटून भाजपने (BJP) आघाडी घेतली. यावरुन काँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी निवडणूक आयोगाने (Election Commssion) डेटा अपडेटमध्ये उशीर केल्याचा आरोप केला. आता यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी निवडणूक आयोगाला थेट गुलाम म्हटले आहे. 

हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणीला सकाळी आठ वाजेपासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत आलेल्या कलानुसार, एकूण 90 जागांपैकी 51 जागांवर भाजप आघाडीवर असून काँग्रेस केवळ 34 मतदारसंघांमध्ये आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तीन जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत तर तर लोक दल 2 जागांवर आघाडीवर आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी 46 ही मॅजिक फिगर गाठायची आहे. सध्याची परिस्थिती पाहता हरियाणात भाजप (BJP) सत्ता स्थापन करेल, अशी परिस्थिती आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram