Thackeray vs Shinde : धनुष्यबाणासाठी ठाकरे गटाची पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयात धाव ABP Majha
Continues below advertisement
धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासाठी ठाकरे गटाने पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतलीय. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी गोठवण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला अंतरिम आदेश बेकायदा असून हा आदेश रद्द करण्यात यावा, अशी विनंती ठाकरे गटाने केलीय... त्यावर संबंधित प्रकरणी लवकरात लवकर अंतिम निर्णय घ्यावा, असे निर्देश देण्याबाबत स्पष्ट संकेत उच्च न्यायालयाने दिले. दोन्ही पक्षकारांनी लेखी स्वरूपात ठळक मुद्दे मांडावेत, असं न्यायालयाने सांगितलंय. ठाकरे गटाच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे...
Continues below advertisement