Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : काँग्रेसच्या वोटबँकमुळे उबाठा जिंकली, शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार

Continues below advertisement

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : काँग्रेसच्या वोटबँकमुळे उबाठा जिंकली, शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार 
: वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा वरळी डोम इथं झाला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे यांनी निवडून आलेल्या सर्व सातही खासदारांचं स्वागत आणि सत्कार केला. मुख्यमंत्री म्हणाले, हा बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन आहे. बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना मला वेगळा आनंद आणि वेगळी भावना आहे. १९६६ साली बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली. मराठी माणूस हा बाळासाहेबांचा केंद्र होता. शिवसेना पूर्ण देशात हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना म्हणून लोकप्रिय झाली. 

शिवसेना वाढली ठाण्यात, कोकणात, संभाजीनगरमध्ये, महाराष्ट्रात. हे सर्व शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. हे बालेकिल्ले अबाधित राखले. कोणी म्हणाले ठाणे पडेल, कल्याण पडेल, पण आपण हे किल्ले २-२ लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकलं.संभाजीनगर जिंकलं, कोकणात एकही जागा उबाठाला मिळू शकली नाही. हा विजय घासून-पुसून नाही, ठासून विजय मिळवला

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram