Sena vs Sena: 'सरकार दगाबाज', Uddhav Thackeray यांचा घणाघात, आजपासून Marathwada दौरा सुरू.
Continues below advertisement
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारला 'दगाबाज' संबोधून मराठवाड्याच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. 'सरकारनं दिलेल्या पॅकेजचं काय झालं?' असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर घणाघात केला आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना आणि शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे भेट देणार असून, त्यांच्याशी थेट बांधावर जाऊन संवाद साधणार आहेत. सरकारने जाहीर केलेल्या जवळपास ३१ हजार कोटींच्या पॅकेजची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली का आणि शेतकऱ्यांच्या हातात खरंच मदत पोहोचली का, याचा आढावा घेणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. या दौऱ्यात त्यांच्यासोबत खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे देखील सहभागी झाले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement