Uddhav Thackeray Mission : उद्धव ठाकरे सुरू करणार मिशन 'अंडरग्राऊंड', गुप्त माणसं करणार गुप्त मिशन

Continues below advertisement

मिशन अंडरग्राऊंडपासून पक्षातल्या सर्व मोठे नेते, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनाही दूर ठेवलं जाणार, हे विशेष. गावातल्या चावडीवर, वाड्या वस्त्यांवर जाऊन पक्षाचं काम लोकांपर्यंत पोहोचवलं जाईल. यासाठी जी माणसं नेमली जाणार आहेत, त्याची माहिती फक्त उद्धव ठाकरे यांनाच असणार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा थेट गावकऱ्यांसमोर मांडला जाणार आहे. सुप्रीम कोर्टातल्या निकालाचे मुद्देही गावा गावात मांडण्याचं काम मिशन अंडरग्राऊंडच्या माध्यमातून केलं जाईल. गाव, तालुका, जिल्हा पातळीवर पक्षाच्या परिस्थितीची सविस्तर माहिती थेट उद्धव ठाकरे जाणून घेणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram