Uddhav Thackeray Thane Speech : बाहेर मनसैनिकांचा राडा,आत भाषण ; उद्धव ठाकरेंनी ठाणे गाजवलं

Uddhav Thackeray Thane Speech : बाहेर मनसैनिकांचा राडा,आत भाषण ; उद्धव ठाकरेंनी ठाणे गाजवलं

Uddhav Thackeray. ठाणे : "नुसत्या घोषणा नाही, तो त्वेष आहे, उद्वेग आहे, संताप आहे. मिंधे सरकार घोषणांचा पाऊस करतय. अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. मिधेंचे कलेक्टर आहेत, चांडाळ चौकडी आहे. त्यांना तुरुंगाचे गज मोजायला सांगूयात. ही गंमत नाहीये, ठाणे उभ राहिलं ते शिवसैनिकांचा प्रेम आहे. शिवसैनिकांनी मेहनत घेतली नसती तर मिंधेंची दाढी उगवली नसती. संजयने उत्तम भाषण केलं आहे. आता उत्सुकता नमक हराम 2 ची आहे. समोर दिसतोय पण तो जगाला दाखवायचा आहे. नागाची उमपा तुम्ही दिली पण मला नागाचा अपमान करायचा नाही. हे मांडूळ आहे. हे सरपटणारे प्राणी आहे. हे मोदींसमोर वळवळणारे म्हांडूळ आहे. रोज घालीन लोटांगण सुरु आहे", असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. ते ठाण्यातील मेळाव्यात बोलत होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola