Uddhav Thackeray On Devendra Fadnavis: आताच्या मुख्यमंत्र्यांचा नंबर खालून पहिला आहेे, ठाकरेंचा आरोप

Continues below advertisement
मराठवाडा दौऱ्यावर असलेले शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'हे आताचं सरकार जे आहे डबल इंजिन सरकार नुसतं धूर सोडतंय, प्रत्यक्षात काहीच होत नाहीये,' अशा शब्दात त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. सरकारने जाहीर केलेलं ३१,८०० कोटी रुपयांचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी तुटपुंजं असून, शेतकऱ्यांची मागणी प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची असल्याचे ठाकरे म्हणाले. पंजाब सरकारने दिलेल्या मदतीचा संदर्भ देत, त्यांनी सध्याच्या पॅकेजच्या तुलनेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात केलेल्या दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीची आठवण करून देताना, ते आपले कर्तव्य असल्याचे ठाकरे म्हणाले. त्यांनी असाही आरोप केला की, कोरोना काळात लोकप्रियतेत एक नंबरवर असलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा क्रमांक आता खालून पहिला आला आहे आणि महाराष्ट्र भ्रष्टाचारात देशात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola