Uddhav Attacks Govt: 'इंग्रजांना घालवलं, हे भ्रष्टाचारी सरकार काय आहे?', उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांसमोर सवाल
Continues below advertisement
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरले. यावेळी त्यांनी अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. 'मुख्यमंत्री क्लीन चिटर आहेत, ते फक्त घोटाळेबाजांना क्लीन चिट देतात', असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. जोपर्यंत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळत नाही आणि ओल्या दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर होत नाही, तोपर्यंत सरकारशी लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांनी तहसीलदारांना घेराव घालून मुख्यमंत्र्यांना जाब विचारायला भाग पाडावे, असे आवाहनही त्यांनी केले. अजित पवारांच्या 'हात-पाय हलवा' या वक्तव्याचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले की, शेतकरी कष्ट करतो म्हणूनच तुम्ही सत्तेत आहात. ‘लाडक्या बहिणी’ योजनेवरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement