Thackeray vs Fadnavis: 'दलदलाला पाझर फुटेल, पण ह्यांना नाही', Uddhav Thackeray यांची जहरी टीका
Continues below advertisement
मराठवाडा दौऱ्यावर असलेले शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक युद्ध पेटले आहे. 'दलदलासुद्धा पाझर फुटेल, पण ह्या निर्दयी निष्ठुर राजकारण्यांना पाझर फुटणार नाही,' अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांशी संवाद साधताना ठाकरेंनी कर्जमाफीच्या आश्वासनाची एक ऑडिओ क्लिप ऐकवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. यावर प्रतिक्रिया देताना, 'ते मुख्यमंत्री असताना संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी 'कारपेट' सोडून कधीच खाली उतरले नाहीत,' असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ठाकरे बाहेर पडले आहेत आणि सरकारचे पॅकेज शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत आहे, असेही फडणवीस म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement