Thackeray vs Shinde: 'हेलिकॉप्टरने जाऊन भाजी कापतो की रेडा?', Uddhav Thackeray यांची टीका

Continues below advertisement
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर हेलिकॉप्टर प्रवासावरून आणि भ्रष्टाचारावरून जोरदार टीका केली आहे, तसेच येत्या सोमवारी ठाण्यात भ्रष्टाचाराविरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे, ज्यामध्ये मनसे (MNS) देखील सहभागी होणार आहे. 'घरातलं शत्रुत्व सगळं बंद करा आणि आपल्या मुळावरती जो आलेला आहे त्याला पहिले उखडून फेकून द्या,' असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरने शेतात जाण्यावर 'पंचतारांकित शेती' अशी टीका करत, 'भाजी कापतो का रेडा कापतो माहिती नाही' असा टोलाही ठाकरेंनी लगावला. मुंबई आणि ठाणे महापालिका लुटल्याचा आरोप करत, मुंबई महापालिकेवर सव्वा दोन लाख कोटींचे कर्ज केल्याचा दावा त्यांनी केला. ठाकरे आणि मनसेच्या या संयुक्त मोर्चाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola