Uddhav Thackeray Shivsena : एकाच्या उमेदवारीमुळे; दुसऱ्याच्या बंडखोरीची भीती Special Report

Continues below advertisement

Uddhav Thackeray Shivsena : एकाच्या उमेदवारीमुळे; दुसऱ्याच्या बंडखोरीची भीती Special Report

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सांगण्यावरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मुकेश शहाणे यांनी केला होता. त्यानंतर, आता सुधाकर बडगुजर (Sudhakar badgujar) यांच्या मुलाविरुद्ध मोक्का अंतर्गत गुन्हा दाख करण्यात आल्याने शिवसेना ठाकरे गटात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर 3 वर्षांपूर्वी झालेल्या गोळीबाराप्रकरणी शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गेल्याच महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. आता, सुधाकर बडगुजर यांच्यां मुलासह इतर 6 जणांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधाकर बडगुजर हे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार असून, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांच्यावर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर बडगुजर यांच्यां मुलावर मोक्का अंतर्गत ही कारवाई होत असून संघटित गुन्हेगारी केल्याचा ठपका ठेवत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.    नाशिकच्या सिडको परिसरात तीन वर्षापूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणी सुधाकर बडगुजर यांच्यावर मोक्का लावण्यात आला आहे.  आरपीआय पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी  15 फेब्रुवारी 2022 रोजी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना दीपक बडगुजर यांच्या सांगण्यावरून हा गोळीबार झाल्याच्या आरोपवारुन गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी 6 जणांना अटक तर, दीपक बडगुजर यास  याधी अटकपूर्व जामीन दखील मंजूर करम्यात आला आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram