Uddhav Thackeray interview:PM मोदी 4 जूननंतर पंतप्रधान राहणार नाहीत, शिंदे भाजपमध्ये विलीन होतील

Continues below advertisement

मुंबई: भाजप हा संपलेला पक्ष आहे, त्यांना स्वतःची पोरं होत नाहीत किंवा नकली संतानही होत नाही, त्यामुळेच त्यांना इतर पक्ष फोडावे लागतात अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदी झोपले नसल्याने त्यांच्या मेंदूला क्षीण आला असून पंतप्रधान म्हणून मोदींची मुंबईतील शेवटची सभा असेल असं उद्धव ठाकरे म्हणाले. 4 जूननंतर शिंदे भाजपमध्ये विलीन होतील असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी 'एबीपी माझा'शी खास संवाद साधताना भाजपवर टीका केली. 

घाटकोपरमध्ये दुर्घटना घडूनही मोदींनी रोड शो केला

उद्धव ठाकरे म्हणाले की, "महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे. गद्दारांना आणि ज्यांनी गद्दारी करवली त्या दिल्लीतील शाहांनाही माफ करत नाही. जनतेत आक्रोश आणि सूडाची भावना असून गेली दहा वर्षे भाजपच्या जुमल्याला जनता कंटाळली आहे.  घाटकोरपमध्ये दोन दिवसांपूर्वी दुर्घटनेत 16 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतरही मोदींनी वाजत गाजत रोड शो केला. लोकांना कोणतीही कल्पना न देता मेट्रो बंद केली. त्यामुळे लोकांमध्ये भाजपविरोधात प्रचंड आक्रोश आहे."

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram