Uddhav Thackeray Car Attack : कारवर नारळ, शेण फेकल्यानंतर ठाकरेंचे शिलेदार आक्रमक
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray Car Attack : कारवर नारळ, शेण फेकल्यानंतर ठाकरेंचे शिलेदार आक्रमक
Thane Shiv Sena Vs MNS Rada: शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून काल (10 ऑगस्ट) ठाण्यातील गडकरी रंगायतन या सभागृहात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह खासदार संजय राऊत आणि अनेक महत्वाचे नेते रात्री 8.30 च्या दरम्यान ठाण्यात दाखल झाले होते. यावेळी उद्धव ठाकरेंच्या गाड्यांच्या ताफ्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) शेण आणि बांगड्या फेकण्यात आले. त्यामुळे ठाण्यात रात्रभर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचे दिसून आले.
मनसेचे 50 ते 60 कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमास्थळी घुसल्याने मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या जास्त होती. या प्रकारानंतर शिवसैनिकही त्याठिकाणी जमा झाले आणि गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यानंतर गुन्हा देखील नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली. तसेच या आंदोलनानंतर सर्व कायकर्त्यांना पोलिसांनी नौपाडा पोलीस स्थानकात आणले होते. यावेळी या महिला कार्यकर्त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना व्हिडीओ कॉल केला आणि एकच जल्लोष करण्यात आला.