Uddhav Thackeray Saamana Interview | ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपचा पलटवार, 'ब्रँड संपला!'
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सामनामधील मुलाखतीवरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उपाध्ये यांच्या मते, मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्या विचारांमध्ये विरोधाभास आणि गोंधळ दिसून आला. दररोज ठरवून मुलाखती घेतल्या जातात आणि प्रश्न-उत्तरांचे सत्र चालते, अशी टिप्पणी उपाध्ये यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिल्याने 'ठाकरे ब्रँड' संपला, असे उपाध्ये म्हणाले. २०१९ मध्ये काँग्रेससोबत गेल्याने बाळासाहेबांच्या विचारांना धक्का लागला, असे त्यांचे म्हणणे आहे. उद्धव ठाकरे 'भिक्केचा कटोरा हातात घेऊन बाबा मला भिक दे भिक दे, माझ्यासोबत ये, माझ्यासोबत ये' असे राज ठाकरे यांना आवाहन करत असल्याचा आरोप उपाध्ये यांनी केला. मुंबईतील मराठी माणसांची संख्या कमी झाली असून, ८२ टक्के मराठी माणूस शिल्लक होता, तो आता ५० टक्के झाला आहे, असे उपाध्ये म्हणाले. नालासोपारा आणि गोवंडीपर्यंत मराठी माणूस हलवला गेला, मुंबईतून बाहेर पाडविला. हे पाप उद्धव ठाकरे यांनी केले आहे, असे उपाध्ये यांनी म्हटले. महानगरपालिका आपल्या घशात कशी घालता येईल, यावरच त्यांचे लक्ष केंद्रित आहे, असा आरोपही त्यांनी केला. मुंबईतील जनता याला भीक घालणार नाही, असे उपाध्ये यांनी स्पष्ट केले.