Uddhav Thackeray : नार्वेकरांनी लोकशाहीची हत्या केली, सुप्रीम कोर्टानं सुमोटो कारवाई करावी-ठाकरे

Continues below advertisement
Uddhav Thackeray : नार्वेकरांनी लोकशाहीची हत्या केली, सुप्रीम कोर्टानं सुमोटो कारवाई करावी-ठाकरे
आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार, सुप्रीम कोर्टानं सुमोटो कारवाई करावी, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. 
Shiv sena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी (Shiv Sena MLA disqualification final result ) अखेर जवळपास दीड वर्षानंतर अंतिम निकाल जाहीर झाला. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी जवळपास दीड तास निकालाचं वाचन केलं. त्यानुसार, ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं. मात्र खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच आहे. शिंदे यांच्या शिवसेनेचे भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनाच व्हिप म्हणून मान्यता आहे. ठाकरे गटाचे सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांचा व्हिप अमान्य. महत्त्वाचं म्हणजे राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेची 2018 ची घटनादुरुस्ती अमान्य करत, उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून नियुक्तीच अवैध ठरवली. त्याशिवाय उद्धव ठाकरे हे केवळ पक्षप्रमुख म्हणून कोणालाही मनमर्जीने हटवू शकत नाहीत. एकनाथ शिंदे यांना हटवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेऊ शकत नाहीत. त्यासाठी कार्यकारिणीची मंजुरी आवश्यक होती, असं राहुल नार्वेकर म्हणाले. आमदार अपात्र करण्याबाबत दोन्ही गटांनी केलेल्या याचिका फेटाळत, राहुल नार्वेकर यांनी कोणालाही अपात्र ठरवलं नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram