Uddhav Thackeray Raigad Speech : भ्रष्टाचार करा, भाजपात या, मोदी गॅरंटी, रायगडमधून सडकून टीका

Uddhav Thackeray : "शेवटचा अर्थसंकल्प मोदी सरकारने सादर केला आहे. मी काय बोललो शेवटचा.  हे सगळे जादूचे प्रयोग सुरु आहेत. अर्थ संकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार असल्याची घणाघाती टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.  उद्धव ठाकरे हे दोन दिवस रायगड दौऱ्यावर आहेत. पेण येथे त्यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. मी मागच्या आठवड्यात कल्याण लोकसभा मतदारसंघात फिरलो.  आतां म्हटलं तुम्हाला भेटूया. सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये मी जाणार आहे. याची सुरुवात पेणपासून झाली आहे. शेवटचा अर्थसंकल्प मोदी सरकारने सादर केला आहे. मी काय बोललो शेवटचा. निर्मला सीतारामन यांनी जड अंत करनाने हा अर्थसंकल्प मांडल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola