Uddhav Thackeray Raigad Daura : रायगड लोकसभा मतदारसंघांत उद्धव ठाकरे यांच्या आज आणि उद्या पाच सभा
abp majha web team
Updated at:
01 Feb 2024 08:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्धव ठाकरे यांचा आजपासून रायगड जनसंवाद दौरा सुरु होणार आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण पाच सभा घेतल्या जाणार आहेत. आज सकाळी ११ वाजता पेण शहर प्रायव्हेट हायस्कूलजवळ उद्धव ठाकरेंचे स्वागत होईल. त्यानंतर दुपारी तीन वाजता चौल तालुक्यात ठाकरेंची सभा होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता रोहा एमआयडीसी बायपास रोड उरुस मैदान इथे सभा होईल. तर उद्या म्हणजेच २ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता म्हसळा शहरातील दिघी रोड इथे सभा होणार आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता पोलादपूर इथे काळ भैरव सहान इथे सभा होईल. त्यानंतर माणगावात उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे.