Uddhav Thackeray Rada VIDEO : उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांवर नारळ फेकून मारले, काचाही फोडल्या
Continues below advertisement
ठाणे : ठाण्यात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेमध्ये मोठा राडा झाला असून आक्रमक मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांवर नारळ फेकून मारले. त्यामध्ये ठाकरेंच्या ताफ्यातील अनेक गाड्यांच्या काचा फुटल्याचं समोर आलं आहे. तसेच मनसैनिकांनी ठाकरेंच्या गाडीवर शेण आणि बांगड्याही फेकल्याचं समोर आलं. त्यामुळे शिवसेना आणि मनसेमधील वाद तापला असून त्याला कोणतं वळण मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
ठाण्यातील रंगायतन सभागृहात ठाकरे गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी जाताना उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर मनसैनिकांनी शेण आणि बांगड्या फेकल्या. मनसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर नारळ देखील फेकून मारले. त्यामुळे अनेक गाड्यांचं नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये काही गाड्यांच्या काचा फुटल्या असून शिवसैनिकही जखमी झाल्याची माहिती आहे.
Continues below advertisement