Uddhav Thackeray KEM Protest : ठाकरे गटाच्या वतीनं केईएम रुग्णालयात मोर्चा,अपुऱ्या सोयसुविधांचा आरोप

शिवसेनेतल्या ठाकरे गटाच्या वतीनं केईएम रुग्णालयातील अनागोंदी कारभाराविरोधात आज मोर्चा काढण्यात आला. केईएम रुग्णालयातल्या अपुऱ्या सोयसुविधांमुळं रुग्णांचे हाल होत असल्याच्या तक्रारी असून, त्याविरोधात प्रशासनाकडून पावलं उचलली जात नसल्यानं ठाकरे गटाकडून हा मोर्चा काढण्यात आला. यासंदर्भात मुंबई महापालिकेलाही ठाकरे गटाकडून  जाब विचारण्यात येणार आहे. केईएम रुग्णालयातल्या समस्या दूर करण्यासाठी येत्या पंधरा दिवसात प्रशासनाकडून पावलं उचलण्यात आली नाहीत, तर पुढचा मोर्चा मुंबई महापालिका आयुक्तांच्या दालनावर काढण्यात येईल असा इशारा ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी दिला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola