Uddhav Thackeray : ठाकरे विरुद्ध शिंदे गटाचा संघर्ष शिगेला, उद्धव ठाकरेंकडून शिवसैनिकांचे कौतुक
Uddhav Thackeray : ठाकरे विरुद्ध शिंदे गटाचा संघर्ष शिगेला, उद्धव ठाकरेंकडून शिवसैनिकांचे कौतुक. राज्यात शिवसेना आणि शिंदे गटाचा संघर्ष आता अधिकच तीव्र होतोय. काल रात्री मुंबईत प्रभादेवी इथं शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राड्यानंतर ठाकरे समर्थक शिवसैनिकांवर कारवाई करण्यात आली होती.. याविरोधात शिवसेना नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत पोलीस ठाण्यात धाव घेतली. सेना नेत्यांनी कार्यकर्त्यांविरोधात दाखल केलेलं कलम ३९५ रद्द करण्याची मागणी केली. पोलिसांनी ही मागणी मान्य केली. शिवसेना कार्यकर्त्यांनी जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांचं मातोश्रीवर स्वागत करण्यात आलं. उद्धव ठाकरेंनी या कार्यकर्त्यांच कौतुकदेखील केलंय.