Uddhav Thackceray Audio Clip: उद्धव ठाकरेंनी ऐकवली फडणवीस-पवार यांची ऑडिओ क्लिप

Continues below advertisement
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. 'शेतकऱ्यांनो मतदानापूर्वी कर्जमाफीची मागणी करा,' असे आवाहन करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी, ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पूर्वी दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची एक ऑडिओ क्लिप शेतकऱ्यांना ऐकवली. 'हे गद्दारांचे सरकार आहे, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवं', असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. सरकारने तातडीने कर्जमाफी जाहीर करावी आणि बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५०,००० रुपयांची मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola