Uddhav Thackeray on SambhajiRaje : संभाजीराजेंची माफी,ठाकरे म्हणाले; आम्ही खाल्लं असेल शेण पण...

कोल्हापूर : येत्या 14 मे रोजी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. त्याआधी या मतदारसंघात आरोप-प्रत्यारोपाचे पेव फुटले आहे. या जागेवर महायुतीकडून संजय मंडलिक उभे आहेत. तर महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी दिलीय. दरम्यान, महायुतीला कात्रीत पकडण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) पक्षाने राज्यसभेचा मुद्दा बाहेर काढला होता. राज्यसभा निवडणुकीवेळी शिवसेनेने (तेव्हाची अविभाजित शिवसेना) संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली नाही. मग आता का राजघराण्याचा पुळका आला, असा सवाल शिवसेनेचे उदय सामंत यांनी केला. यावरच आता शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत भाष्य केलं आहे. मी चुकलो असेन तर संभाजीराजे यांची माफी मागतो, असं ठाकरे म्हणाले आहेत. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola